राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान, शरद पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील या परिस्थितीला संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “…तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करणारच”, राष्ट्रवादीतील अस्थितरेदरम्यान बावनकुळेंचं मोठं विधान

Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

काय म्हणाले संजय शिरसाट?

“शिवसेना फोडण्यामागे सर्वात मोठा हात संजय राऊतांचा होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील परिस्थितीलाही संजय राऊतच जबाबदार आहेत. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबात कलह माजवण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला आहे. काही दिवसांनी अशी वेळ येईल,की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय राऊतांना रस्त्यावर मारतील”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

हेही वाचा – “चाटूगिरी करू नका, चोंबडेपणा थांबवा”; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले…

संजय राऊतांमुळे मविआसुद्धा टीकणार नाही

पुढे बोलताना, “संजय राऊत हे सर्वच पक्षांचे प्रवक्ते आहेत म्हणूनच नाना पटोले यांनी त्यांना चोंबड्या म्हटलं आहे. हाच महाविकास आगाडीतील सुसंवाद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ जास्त दिवस टीकेल असं वाटत नाही. संजय राऊत ही महाविकास आघाडी टीकू देणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “राष्ट्रवादीचा राज्यातला कारभार अजितदादा…”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “सुप्रियाताई…”

दरम्यान, काल शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक आपल्या पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. ते म्हणाले, “मी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे या अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा प्रवास ६३ वर्षांपासून अवरित सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. आता राज्यसभेच्या सदस्यत्वाची ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा प्रयत्न असेल, १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे अधिक मोह न करता मी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतो आहे.”