लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली होती. त्यानंतर, आता राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वर्मा हे १९९० च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असून सध्या कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते एप्रिल २०२८ मध्ये निवृत्त होणार आहेत.

आणखी वाचा-आतषबाजीत मुक्या प्राण्यांची फरपट, दिवाळीच्या चार दिवसांत ३१ प्राणी व पक्षी जखमी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्यात यावी. त्यांच्याकडील कार्यभार सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्यानंतरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे (मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर) देण्यात यावा. तसेच, मुख्य सचिवांनी सेवाज्येष्ठता व योग्यतेनुसार तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी नावे मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवावीत, यापैकी एका अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, वर्मा यांची महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader