मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकारी व म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना आठवडाभरापूर्वी विमानतळावर अडवण्यात आले. ते श्रीलंकेला जात होते, असे समजले. करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) जारी केलेल्या लुक आऊट सर्कुलरच्या आधारावर त्यांना विमानतळावर अडवण्यात आले.

१९९६ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यापूर्वी जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते आणि त्यांनी कोविड सेंटरसंबंधी आरोग्य सेवा, कर्मचारी आणि उपकरणे यासाठी करारनामे देण्यासंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यामुळे ईडी त्याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना बोलवले आहे. याप्रकरणी  ईडीने १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी १५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ५० स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक, सुमारे ६९ लाख रुपये रोख व दोन कोटी ४६ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सनदी अधिकारी जयस्वाल यांच्या वांद्रे (पूर्व) येथील निवासस्थानावर छापा टाकून १३ लाखांची रोकड जप्त केली. त्यासोबतच मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. ईडीने जयस्वाल यांची मढ आयलंडमधील अर्धा एकर जमीन आणि त्यांच्या इतर अनेक मालमत्तांचीही ओळख पटवली आहे. ती मालमत्ता वडिलोपार्जीत असल्याचे जयस्वाल यांच्याकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. करोना सेंटर गैरव्यवहाराप्रकणी ते ईडीच्या कार्यालयातही चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  त्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी चौकशी करत आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
Story img Loader