कवी संजीव खांडेकर यांच्या ‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’ या कवितेचा रंगमंचीय आविष्कार पुण्यातील तरुणांच्या एका समूहाने नुकताच सादर केला. वैचारिक बैठक असलेल्या एका कवितेचे रंगमंचीय माध्यमांतर करण्यात आले होते.
खांडेकर यांच्या या कवितेतील ‘कुबडा’ हे पात्र आपल्या गोष्टीची सुरुवात ‘माझा बाप मेला आणि मी गावात हत्तीवरून साखर वाटून आलो’ असे म्हणत करते. या कुबडय़ाला ‘मि. इंडिया’ व्हायचे आहे आणि हे साध्य करण्यासाठी त्याला बुद्धाच्या मार्गावर जायचे आहे. हे साध्य आणि साधन परस्परविसंगत नसले तरी त्यात कोणती संगतीही नाही. पाठीवरचे कुबड हे परंपरांचे, पूर्वग्रहांचे, कर्मकांडाच्या जोखडाचे आहे. ते त्याला नकोसे झालेले आहे. ते जोखड उतरवून फेकायचे आहे. नव्या जगाच्या स्पर्धेसाठी तयार व्हायचे आहे.
कवितेतील कुबडा हे पात्र स्वत:ला काय मिळवायचे आहे, याचा निश्चित निर्णय घेणारे आहे. आपल्या साध्याला आवश्यक साधने काय, त्याचा वेध घेणारा व त्याच्या आड येणाऱ्या कुटुंबासह साऱ्या तथाकथित जवळच्या गोष्टी नाकारणारा, निष्ठुरपणे स्वत:च त्या नष्ट करणारा असे आहे. खांडेकर यांच्या कवितेतील नेमके ‘मिथक’ पकडून त्याचा रंगमंचीय आविष्काराशी मेळ घालण्याचे काम अविनाश सपकाळ यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा