अमिताभ बच्चन यांच्या पंचकोटी महामनीचा जॅकपॉट मुंबईच्या सनमीत कौर साहनी या गृहिणीने पटकावला आहे. सनमीत ‘कौन बनेगा करोडपती’च्या सहाव्या पर्वाची पहिली विजेती आणि या कार्यक्रमात पाच कोटी जिंकणारी दुसरी विजेती ठरली आहे.
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली सनमीत गृहिणी असून ती घरीच शिकवण्या घेते. सनमीतचे पती सहकलाकार म्हणून चित्रपटांमधून काम करतात. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. याआधीच्या पर्वामध्ये बिहारच्या सुशीलकुमारने पहिल्यांदा केबीसीमध्ये पाच कोटी रूपये जिंकले होते. सुशीलकुमारही संगणक शिक्षक होते आणि महिना ६ हजार रूपये कमावत होते. सामान्यांना केवळ ज्ञानाच्या जोरावर पंचकोटी जिंकण्याची संधी देणारा केबीसी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळे सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो म्हणून गणला गेला आहे.

Story img Loader