ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं.

सभागृहातील कामकाज तहकूब केल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत आणि थेट शिवी देत संतप्त प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हा डाकू आहे, त्याच्यावर ३९५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष बांगर यांनी केली.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
MPs scuffle outside Parliament Case filed against Rahul Gandhi
संसदेबाहेर आखाडा! खासदारांमध्ये धक्काबुक्की; राहुल गांधींविरोधात गुन्हा

हेही वाचा- “जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही”, राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता संतोष बांगर म्हणाले, “संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतो आणि आम्हालाच चोर म्हणत आहे. मला वाटतं, हा संजय राऊत डाकू आहे डाकू… त्याच्यावर ३९५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा.” अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर संतोष बांगर यांनी गलिच्छ भाषेत संजय राऊतांना शिवीगाळ केली.

हेही वाचा- VIDEO: “तुम्ही गद्दार आहात, एका डाकूबरोबर…”, बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापलं

“संजय राऊत आम्हाला ज्या पद्धतीने चोर म्हणत आहेत, मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी चोर म्हटलं आहे. अशा हरा**** महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही,” असंही संतोष बांगर पुढे म्हणाले.

Story img Loader