धमकीप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयात सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांची भेट घेतली. चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी गेल्या महिन्यात संतोषी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणी नाडियादवाला यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी रॉय यांच्याकडे केली.
फिरोज नाडियादवाला आणि राजकुमार संतोषी एका चित्रपटाच्या प्रकल्पावर काम करत होते. काही कारणामुळे संतोषी या प्रकल्पातून वेगळे झाल्यामुळे नाडियादवाला यांना मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी ते त्यांच्यावर दबाव आणत होते.
गेल्या महिन्यात नाडियादवला यांनी संतोषी यांच्या घरी जाऊन शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
तशी तक्रार संतोषी यांनी जुहू पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी नाडियादवाला यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शुक्रवारी संतोषी यांनी सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांना भेटून केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा