१९३८ – २०२२

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : संतूरवाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे जगविख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा राहुल शर्मा असा परिवार आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकसंगीतातील संतूर हे वाद्य रागसंगीताच्या मैफलीत सादर करून त्याला स्वतंत्र वादनाचा दर्जा मिळवून देणारे पंडित शिवकुमार शर्मा हे पहिले कलावंत होत. अभिजात संगीताबरोबरच चित्रपट संगीतातही एक प्रयोगशील संगीतकार म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कलावंताच्या निधनामुळे प्रतिभावान आणि सर्जनशील तपस्वी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आह़े

गेली सात दशके भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या पंडितजींचे भारतासह जगभरात कार्यक्रम झाले. संतूरवाद्याला रसिकांनी स्वीकारावे आणि त्यास प्रतिष्ठा मिळवून द्यावी, यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यासाठी या वाद्याच्या मूळ साच्यात आवश्यक ते बदल केले आणि लोकसंगीतातील संतूरला जागतिक पातळीवर नेण्यात यश मिळवले.

गेले काही महिने पंडित शिवकुमार हे मूत्रपिंडाशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. मंगळवारी ही झुंज संपली. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संगीत क्षेत्रातील नामवंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. शर्मा यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.