मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी लोणावळ्यानजीक एसटीची बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाल्याचेही समजत आहे. लोणावळ्यातील पांगोळी गावानजीक साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येण्यास निघालेली ही एसटी ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बचावकार्याला सुरूवात झाली असून, एसटी दरीतून बाहेर काढण्यासाठी अपघातस्थळी चार क्रेन्स आणण्यात आल्या आहेत. अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी ५ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत.

Story img Loader