धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी रद्द करण्यात आली. पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात २५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाच दिवसात पडलेल्या पावसाने जलाशयात मोठी वाढ झाली आहे.

जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील जलसाठा खालावला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे आणि पुरेसा जलसाठा उपलब्ध झाल्याने ८ जुलैपासून पाणीपुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे.

river, Indians, source of water, faith, river news,
अभ्यासपूर्ण नदी परिक्रमा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
Mumbai air, Mumbai air moderate category, Byculla,
मुंबईची हवा पुन्हा ‘मध्यम’ श्रेणीत; भायखळा, माझगाव येथील हवा ‘वाईट’
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
India Meteorological Department forecasts winter beginning on November 1
थंडीची चाहूल… राज्यात दिवाळीपासून थंडीची तीव्रता वाढणार…
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
pune citizens are in trouble due to bad weather Care advice from healthcare professionals
खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्यातुलनेत २७ जून २०२२ रोजी एक लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. शुक्रवारी तीन लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.