satish_mathurपुण्याचे माजी पोलीस आयुक्त सतीशचंद्र माथूर यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी राज्याच्या गृह विभागाकडून या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. सतीशचंद्र माथूर यांची पुण्यातून बदली करताना त्यांच्याकडे राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालकपद देण्यात आले होते. त्यावेळीच विजय कांबळे यांच्याकडे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद देण्यात आले होते. कांबळे यांच्या निवृत्तीनंतर या पदावर सतीशचंद्र माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader