लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील रेल्वेमार्ग, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी व इतर अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन, तर हार्बर मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रविवारी लोकल प्रवास करणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. लोकल अवेळी धावतील आणि इच्छित स्थानकात उशिराने पोहचतील.

Uttar Pradesh News Denied petrol
Uttar Pradesh : हेल्मेट न घातल्याने पेट्रोल नाकारले, संतप्त लाइनमनने थेट पेट्रोल पंपाची वीजच खंडीत केली; प्रशासने दिले चौकशीचे आदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
445 Anganwadis in Shahapur taluka in darkness due to lack of electricity connection
शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
diva vasai trains cancelled
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ असा चार तासांचा ब्लॉक
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथे येणार्‍या अप मेल / एक्स्प्रेस माटुंगा आणि भायखळ्यादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथील फलाट क्रमांक ३ वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मेल / एक्स्प्रेस माटुंगा आणि भायखळ्यादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर फलाट क्रमांक १ वर दोनदा थांबा देण्यात येईल.

आणखी वाचा-सार्वजनिक आरोग्य विभागातील सक्तीने निवृत्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा

हार्बर मार्ग

कधी : कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कुठे : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल / बेलापूर आणि बेलापूर – सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल.

Story img Loader