मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. सीएसएमटी - पनवेल आणि ट्रान्सहार्बर मार्गिका ठाणे - पनवेलदरम्यान मेगाब्लॉक नाही. कुठे : मस्जिद आणि कुर्ला अप आणि डाऊन धीमा मार्ग कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत हेही वाचा - चार वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर हेही वाचा - मुंबई – कुडाळदरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबतील. त्यानंतर पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.