लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा विभागातील विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रात्रकालीन लोकल सेवेत आणि रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

मध्य रेल्वेवरील खडवली-वासिंद, आसनगाव-आटगाव आणि शहाड-आंबिवली स्थानकांदरम्यान पादचारी पुलाच्या तुळया उभारणीसाठी शनिवारी रात्री १२.४५ ते पहाटे ५.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत रात्री १२.१५ ची सीएसएमटीवरून कसाऱ्याला जाणारी लोकल ठाण्यापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर, रात्री ३.५१ ची कसारा – सीएसएमटी लोकल ठाण्यावरून चालवण्यात येणार आहे.

आणखी वाचा-दुपारी अडीचपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावरच, ‘एम.ए.’च्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका

विदर्भ एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, हटिया एक्स्प्रेस,महानगरी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

Story img Loader