स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठीप्रमाणेच उर्दू भाषेतही काही गज्मलांचे लेखन केले होते. या गजला आता दादरच्या स्वा. सावरकर स्मारकात पाहायला मिळत आहेत.
सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविल्यानंतर पहिल्यांदा कारागृहात नेण्यात आले तेव्हा त्यांनी पहिली गज्मल लिहून लढा तीव्र करण्याचे आवाहन केले होते. या सर्व गझला ‘मुसलसल’ शैलीत लिहिलेल्या आहेत. या सर्व गज्मलांचे लेखन १९२१ मध्ये झाले असून सावरकर यांनी आपली ही वही त्या वेळी कारागृहाचे लिपिक प्यारेलाल यांना दिली होती. प्यारेलाल यांनी ती नंतर सावरकर यांचे सहकारी श्री. पु. गोखले यांना दिली. गोखले यांच्या पश्चात ही वही गोखले यांच्या कन्या आणि सावरकर स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांना मिळाली. आता ती स्मारकात जतन केली जाणार आहे.
अन्वयार्थ : सावरकरांची गज्मल
सावरकर यांची उर्दू गज्मल शब्दश:
खुशी के दौर से है यां रंजो मुहन पहले
बहार आती है पीछे और ख्मिजां गिरदे चमन पहले।ा
मुहिब्बाने वतन होंगे हजारों बेवतन पहले
फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमन पहले॥
अभी मेराजका क्या ज्मिक्र यह पहली हि मंज्मिल है
हजारो मंज्मिलें करनी हे ते हमको कठन पहले।
मुनव्वर अंजुमन होती है, महफिल गर्म होती है
मगर कब जब के खुद जलती
है शमा-ए-अंजुमन पहले।
हमारा हिंद भी फूले फलेगा एक दिन लेकिन
मिलेंगे खाक में लाखो हमारे गुलबदन पहले।
हमारा हिंदभी यूरोपसे ले जाएगा बाज्मी
तिलक जैसे मुहिब्बाने-वतन हो इंडियन पहले।
न सेहत की करे परवा, न हम दौलत के तालिब हो
करे सब मुल्क पर कुरबान तन मन और धन पहले ।
हमे दुख भोगना लेकिन हमारी नस्ले सुख पायें
ये मनमे ठान ले अपने ये हिंदी मदरेजन पहले।
यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयां मेरा,
मै बंदा हिंदवाला हूं, यह हिदोस्तां मेरा पहले।
मूळ उर्दू गज्मलेचा मराठी अर्थ
आनंदाचे क्षण नंतर आहेतच, प्रथम कष्ट, प्रयत्न हवेत. बागेभोवती आता पानगळ आहे, पण लक्षात ठेवा वसंत ॠतू मागोमाग येत आहे. या देशावर प्रेम करणारे खूप होते, पण आधी हजारोंना निर्वासित व्हावे लागेल. आपल्या भारताची भरभराट होईल; पण प्रथम अंदमान (हिंदी वा उर्दूतला उच्चार ‘अंदमन’) भरेल, तेव्हा कुठे!
अजून शिखराच्या गोष्टी का करता, आता (काळय़ा पाण्याची शिक्षा ही) पहिलीच पायरी आहे, हजारो पायऱ्या पार करून साध्य गाठायचे आहे. आमच्या भारताचीसुद्धा एक दिवस भरभराट होईल, पण आधी आमच्यासारखे लाखो सुकुमार धुळीत मिळायला हवे.
आमचा प्राणप्रिय भारत युरोपपेक्षा अधिक प्रगती करेल, पण त्यासाठी लोकमान्य टिळकांसारखे देशावर प्रेम करणारे निर्माण व्हावे लागतील. आपण सर्वानी पैशाचीच संथा न घेता, तब्येतीचीदेखील पर्वा न करता प्रथम आपण भारतभूवर जीव ओवाळून टाकू, तनमनधनाने तिची सेवा करू या. आपणा सर्व भारतीयांनी एकच गोष्ट मनोमन पक्की करून ठेवायला हवी की, आम्ही दु:ख भोगल्याशिवाय आमच्या पुढल्या पिढय़ा सुखी होणार नाहीत.
प्रलयाचा दिवस येईल, तेव्हाही तुम्ही माझी वाणी हेच बोलताना बघाल की, मी हिंदुस्थानचा आहे, हा हिंदुस्थान
माझा आहे.