डिझेलऐवजी विजेवर धावणारी रेल्वे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याने भारतीय रेल्वेमध्ये विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून वर्षाला ५५६.५६ कोटी रुपयांची बचत करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे.

हेही वाचा- मार्च महिन्यात शेवटची लोकल सीएसएमटी – कर्जत बदलापूरपर्यंतच; कर्जतमधील प्रवाशांचे होणार हाल

National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
knight frank report, Private investment Mumbai ,
मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती
ST Bus Income Pune , ST Bus Maharashtra,
राज्यात ‘एसटी’ची सर्वाधिक भ्रमंती कोठे ? कोणी केली सर्वाधिक कमाई ?
Kalyan Dombivli Municipal corportion,
कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी १४०० कोटी रुपये; ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
foreign direct investment
विश्लेषण : थेट विदेशी गुंतवणुकीचे उच्चांकी शिखर; जगाला भारताचे आकर्षण कशामुळे?
Increase in outstanding loans under Pradhan Mantri Mudra Yojana
 ‘मुद्रा’तील सर्वाधिक थकीत कर्ज मुंबईत; राज्यातील थकबाकी ५,५२७ कोटींवर

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी कार्यरत असून २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच, विद्युतीकरणामुळे सर्वच रेल्वेची गती वाढणार असून वेळेची बचत होणार आहे. यासह मुंबई विभागाची इंधन खर्चावरील ५५६.५६ कोटी रुपयांची बचत होईल. तसेच वार्षिक १.६४ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, डिझेल इंजिन सेवेतून बाद करण्यास सोयीस्कर होईल.

हेही वाचा- मुंबईतील ‘या’ दोन मेट्रो स्थानकांवर आता असणार माहिलाराज, मेट्रो स्थानक चालविण्याची संपूर्ण जबाबदारी महिलांवर

देशातील पहिली विद्युत रेल्वे ही १९२५ साली हार्बर मार्गावरील तत्कालिन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्लादरम्यान धावली. त्यानंतर, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर करण्यास २००१ मध्ये सुरुवात झाली आणि २०१६ पर्यंत पूर्ण झाले. त्यामुळे उपनगरीय विभागात नऊ डबा लोकल सेवेचे रूपांतर १२ डबा लोकलमध्ये करण्यात आले. त्यामुळे ३३ टक्के प्रवासी क्षमता वाढली.

हेही वाचा- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : इगतपुरी – आमणे टप्प्याचे ७९ टक्के काम पूर्ण, सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कामाचा समावेश

मुंबई विभागात २०१९ मध्ये ५५५.५ किमी मार्गाचे पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले. सर्वात शेवटचे विद्युतीकरण पनवेल – पेण – रोहा यादरम्यान करण्यात आले. यामुळे रायगड आणि अलिबाग जिल्ह्यांना मुंबई महानगराशी जोडण्यासाठी फायदा झाला आहे. २०२२-२३ या वर्षात मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या ७७ फेऱ्या विद्युत इंजिनात बदलल्या. मुंबई विभागात विद्युत इंजिनावर चालणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, पंजाब मेल, तेजस एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेसचा समावेश आहे.

Story img Loader