वाशी येथील बिल्डर सुनील लोहारिया खून प्रकरणातील संशयित बिल्डर सुरेश बिजलानी यांचा इंदौर उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिरिम जामीनावर सर्वाच्च न्यायालयाने दोन आठवडय़ाची स्थगिती दिल्याने या काळात बिजलानी यांना अटक करण्याचा मुंबई पोलिसांनी मार्ग मोकळा झाला आहे. इंदौर खंडपीठाने मंजूर केलेला बिजलानी यांचा जामीन नामंजूर करण्यात यावा या संदीप लोहारिया यांच्या अपिलावर सर्वाच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याने बिजलानी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी इंदौर न्यायालयाने बिजलानी यांना साठ दिवसांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे फरार असलेला बिजलानी खारघर मध्ये मित्राच्या घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता.
वाशी येथील वादग्रस्त बिल्डर सुनील लोहारिया याची तीन महिन्यापूर्वी त्याच्या कार्यालयाबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मारणारा मारेकरी आणि त्याच्या चार साथीदारांना नवी मुंबई पोलिसांनी काही तासात अटक केले. लोहारिया कुटुंबियांच्या मागणीनुसार हा तपास नंतर मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सुनील कुमार हत्या प्रकरणात वाशीतील दुसरा प्रतिस्पर्धी बिल्डर सुरेश बिजलानी आणि वास्तुविशारद अनुराग गर्ग यांची नावे अटक केलेल्या मारेकऱ्यांनी सांगितल्याने पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत पण अटकेच्या भितीने हे दोघेही फरारी होते. याच दरम्यान बिजलानी यांनी मध्य प्रदेश मधील इंदौर खंडपीठाकडून साठ दिवसाचा जामिन मिळविला आहे. त्याची मुदत १५ जुलै रोजी संपणार आहे. सर्वाच्च न्यायालयाने इंदौर न्यायालयाच्या जामिन मंजूरीला सर्वाच्च न्यायालयाने दोन आठवडय़ाची स्थगिती दिली आहे. त्यामुळे बिजलानी यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. बिजलानी यांना मंजूर झालेल्या जामिनाच्या विरोधात संदीप लोहारिया यांनी सर्वाच्च न्यायालयात आपिल केले होते. या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी गर्ग मात्र अद्याप फरार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा