महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह कोटय़वधींच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. पंकज भुजबळ यांच्याविरोधात बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे त्यांची अटक अटळ आहे.
SC refuses to stay NBW issued against Pankaj Bhujbal, son of former Maharashtra Minister Chhagan Bhujbal, in a money laundering case.
आणखी वाचा— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 18, 2016
छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) दाखल केलेल्या आरोपपत्रातील पंकज यांच्यासह अन्य ३४ आरोपींच्या नावेही विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी. आर. भावके यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. आरोपी सहकार्य करत नसल्याची तक्रार केल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने ‘ईडी’ला दिले होते.