मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरकारसमोरचा अडथळा दूर झाला आहे.

देशात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली सगळ्यात महत्त्वाकांक्षी संकल्पना ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ‘मेक इन इंडिया वीक’ हा कार्यक्रम गिरगाव चौपाटी येथे आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधानांसह तीन देशांचे पंतप्रधान तसेच देशोदेशीची बडी मंडळी हजेरी लावणार आहेत. गिरगाव चौपाटीवरील दोन लाख चौरस फूट जागेवर येत्या १४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम साजरा होणार आहे.

Story img Loader