मीरा रोड भागाला घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या मीरा रोड येथील मुख्य वाहिनीला गुरुवारी दुपारी खोदकामादरम्यान तडा गेल्याने सर्वत्र घबराट पसरली आणि परिसरातील ग्राहकांचे हाल झाले. मीरा रोड भागातील सृष्टी कॉम्प्लेक्स जवळील नित्यानंद नगर परिसरात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास खोदकाम सुरू असताना ही गॅसवाहिनी तुटली. गॅस मोठय़ा प्रमाणात बाहेर येऊ लागल्याने सर्वत्र घबराट पसरली होती.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गॅसपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महानगर गॅसच्या पदाधिकाऱ्याने घेतला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गॅस पुरवठा बंद झाल्याने मीरा रोड परिसरातील गॅस रात्री पेटले नाहीत.

Story img Loader