मुंबईतील गोरेगाव येथे बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. कुंजन जितेंद्र ठक्कर(३७) असे महिलेचं नाव आहे. याप्रकरणी शाळेच्या बसचालकास दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.गोरेगाव येथील लकी हॉटेलजवळील इराणीवाडी येथे ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुंजन आपले पती जितेंद्र अमृतलाल ठक्कर यांच्यासह गोरेगाव येथील पांडुरंगवाडी परिसरात राहत होत्या. घटनेच्या दिवशी त्या आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर चालल्या होत्या. दरम्यान स्पार्क लिडा टिडेलिंग स्टुडिओसमोर वेगात जाणार्‍या शाळेच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कुंजन गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुंजन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जितेंद्र ठक्कर यांच्या तक्रारीवरुन दिंडोशी पोलिसांनी हलगर्जीपणाने बस चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी बसचालकास अटक केली.