येत्या काळात वैद्यकीय शिक्षण, सनदी लेखापाल (सीए) यासारखे उच्च शिक्षणही मराठीत घेता येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या २०२१-२२ च्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ५० आदर्श शिक्षकांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गुरुवारी प्रदान करण्यात आले. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आयोजित समारंभात पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मार्गदर्शन करताना केसरकर बोलत होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रत्येकी रुपये १० हजार रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

हेही वाचा- “मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत घर घेतील”; संजय राऊतांचा खोचक टोला!

देशात उच्च शिक्षण मातृभाषेत घेता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मातृभाषेत ग्रहण केलेले शिक्षण अधिक प्रभावीपणे समजते. या अनुषंगाने पुढील वर्षी जून महिन्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. येत्या काळात वैद्यकीय शिक्षण, सनदी लेखापाल (सीए) यांसारखे उच्च शिक्षणही मराठीत घेता येतील, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षणासोबत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी चित्रकला, नाटक, गायन इत्यादी कलांमध्ये पारंगत असलेल्या तज्ज्ञ मंडळीद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रयोग शिक्षण विभाग राबवणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच स्रोत कमी असतानाही विद्यार्थी संख्या वाढवण्यास योगदान देणाऱ्या शिक्षकांची गौरव यशकथा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी द्वैमासिक प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा- राज्यात आजपासून ‘वंदे भारत’; देशातील नवव्या, दहाव्या रेल्वेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

या कार्यक्रमाला आमदार यामिनी जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (शिक्षण) केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपसंचालक (शिक्षण) संदीप संगवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा- शेतकऱ्यांसाठी महावितरणने २८ हजार नादुरुस्त रोहित्र बदलले

दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू, सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण, डिजीटल आणि व्हर्च्युअल क्लासरूम, खगोलीय प्रयोगशाळा, संगणकीय प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व सुविधा प्रदान करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य आहे असे नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. अशाप्रकारे शिक्षक जेव्हा सर्व सुविधांचा फायदा घेऊन ज्ञानदान करतील, त्यावेळेस विद्यार्थ्यांचे जीवन घडेल, असे मत आश्विनी भिडे यांनी यावेळी व्यक्त केले.