कांदिवलीतील दुर्घटनेत आई गंभीर जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बसचालकाच्या बेफिकिरीमुळे कांदिवली येथे एका पाच वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांला बुधवारी आपला जीव गमवावा लागला. कांदिवली (प.) येथील भोगीलाल कोडिया रस्त्यावर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात गौतम नायडू या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. यातील गंभीर बाब म्हणजे धडक दिलेली बस ‘नो एन्ट्री’मध्ये घुसली होती. या बसचा चालक बेस्टमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मेहता ट्रॅव्हलमध्येही तो अर्धवेळ काम करत होता.
कांदिवली पश्चिमेच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेत गौतम पहिलीत शिकत होता. त्याची आई त्याला दुपारी शाळेतून घरी नेण्यासाठी आली होती. दुपारी सव्वाबारा वाजता ती भोगीलाल कोडिया मार्गावरील रिक्रिएशन क्लबच्या समोरून रस्ता ओलांडत होती. त्या वेळी मेहता ट्रॅव्हल्सची (एम एच ०४ जी- ५६२१) ही बस ‘नो एण्ट्री’तून आत शिरली. ती सरळ या दोघांच्या अंगावर गेली. त्या बसच्या धडकेत बसच्या पहिल्या चाकाखाली सापडून गौतम जागीच ठार झाला तर त्याची आई लता (३५) गंभीर जखमी झाली. तिच्यावर भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता नायडू यांचा पाय या अपघातात फ्रॅक्चर झाला आहे. अपघातानंतर बसचा चालक जोखालाल यादव (५५) घटनास्थळावरून पळून गेला होता. कांदिवली पोलिसांनी त्याला मालवणी येथून अटक केली. शाळेतील पालकांनी मुलांची ने-आण करण्यासाठी मेहता ट्रॅव्हल्सची खासगी बस नेमली होती, असे कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपळे यांनी सांगितले.