मुंबई: गाडीत एकटीच असलेल्या विद्यार्थिनीला मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून स्कुल व्हॅन चालकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात घडला. याबाबत विद्यार्थिनीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. पीडित ११ वर्षांची मुलगी परिसरातील एका शाळेत इयत्ता पाचवीत शिकते. १९ ऑक्टोबर रोजी शाळेतून घरी येत असताना ती स्कुल व्हॅनमध्ये एकटीच होती. हीच संधी साधून आरोपी तुषार भालेरावने गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात उभी केली आणि मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवत तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तिला धमकावले आणि तिला तिच्या घराजवळ सोडले.

commission for Protection of Child Rights visited school after 14 year old girl molested case school was itself unauthorized
त्या शाळेचे वर्गच अनधिकृत, मुलीचा विनयभंग झालेल्या शाळेबाबत धक्कादायक माहिती
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
14 year old student studying in private school in Badlapur molested by teachers of school
बदलापूरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, संबधित शिक्षकाला पोलिसांकडून अटक
Three youths arrested for abusing a college student in Tathawade pune news
पिंपरी: ताथवडेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर अत्याचार; तीन तरुण अटकेत
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी
Sanitary napkin
परीक्षेला पोहोचताच विद्यार्थीनीला आली मासिक पाळी, तिने सॅनिटरी पॅड मागताच महाविद्यालयाच्या कृतीवर सर्वांनीच व्यक्त केला संताप!

हेही वाचा… मुंबई : गिरगावातील खोताची वाडी येथे प्रशस्त अभ्यासिका सुरु

या प्रकारानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. आईने विचारपूस केल्यानंतरही मुलगी काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र आईने तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आईने बुधवारी याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Story img Loader