मुंबई : भांडुपमध्ये एका शाळकरी मुलीने आई अभ्यासावरून रागावली म्हणून स्वत:च्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव केल्याची घटना भांडुपमध्ये घडली आहे. घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्याने पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी करताच हा बनाव असल्याचे उघडकीस आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेच्या १७५ लोकल रद्द होणार

भांडुप परिसरात अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसह राहते. शनिवारी सकाळी पाऊणेसातच्या सुमारास मुलगी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडली. शाळा सुटली तरी ती घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. ती सापडली नाही. त्यानंतर थेट सायंकाळी चारच्या सुमारास मुलगी घरी परतली. शाळेत जात असताना रिक्षातून आलेल्या तिघांनी तोंडाला रुमाल बांधून ठाण्याच्या दिशेने नेले. तेथे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, अशी माहिती आईला दिली. त्यामुळे आईने मुलीसह भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

आई अभ्यासावरून रागावली म्हणून…

पोलिसांनीही तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. शाळेबाहेरील सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये मुलगी एकटीच चालत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली. तेव्हा, आई अभ्यासावरून रागावली म्हणून हा बनाव केल्याची कबुली तिने दिली.