मुंबई : बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारशी सुचवणारा अहवाल दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला. यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करतानाच्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेने घ्यावी यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या आहेत. अहवालावर दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. निवृत्त न्यायमूर्ती (पान ७ वर) (पान १ वरून) साधना जाधव व निवृत्त न्यायमूर्ती शालिनी जोशी-फणसाळकर यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा समावेश असलेल्या विशेष समितीने आपला अहवाल न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सादर केला. या अहवालाचा आपणही अभ्यास करू. तथापि, अहवाल सरकारकडे सादर करून शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी काय उपाययोजना केल्या जाणार हे दोन आठवड्यांत स्पष्ट करावे, असे आदेश न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा