मुंबई : माझ्या शिक्षणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धडय़ाने आणि माझ्या क्रिकेटचा प्रारंभ सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली, अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील ‘जाणता राजा’ या महानाटय़ाच्या प्रयोगाला शुभेच्छा देताना ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ‘जाणता राजा’चे प्रयोग आयोजित केले आहेत. प्रयोगाची सुरुवात तुळजाभवानीच्या आरतीने होत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करण्यात आली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर यांनी हजेरी लावली. तर शनिवारी सचिन तेंडुलकर यांनी आरती करुन प्रयोगाला शुभेच्छा दिल्या.