मध्य रेल्वे प्रशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील जागतिक ऐतिहासिक वारसा दर्जा मिळालेल्या मुख्य इमारतीत आता हनुमान आणि गणपतीचे शिल्प लावण्यात आली आहेत. सीएसएमटी येथील ऐतिहासिक वारसा इमारत ही १८७८ आणि १८८८ च्या दरम्यान बांधण्यात आली आहे.

ब्रिटीश स्थापत्य शैलीत साकारलेल्या या इमारतीवरील कोरीव काम, अलंकृत बुरूज आणि भव्य घुमट आकर्षणाचा बिंदू आहेत. या इमारतीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या इमारतीसाठी कलाकृती तयार करण्याची स्पर्धा मध्य रेल्वेने आयोजित केली होती. मुंबईतील आघाडीच्या कला महाविद्यालयातील कलाकार आणि विद्यार्थ्यांसाठी कला स्पर्धेत सहभागी झाले होते.

revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
ubt chief uddhav thackeray slam maharashtra government over badlapur incident
विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Goa, citizens Goa angry, Impact of tourism,
गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

हेही वाचा >>> विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे

या स्पर्धेत १० ते १२ कलाकारांनी भाग घेतला. त्यापैकी निवडक कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी वारसा इमारतीमध्ये एक जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, मध्य रेल्वेने स्पर्धेची विजेत्या शिल्पकार सोनाली अय्यंगार यांची गणपती आणि हनुमान यांची शिल्पे इमारतीत लावण्यासाठी निवडली आहेत, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी या शिल्पांचे नुकतेच अनावरण केले. गणपती-मुंबईचे सार आणि हनुमान-कालातीततेचे प्रतीक अशी या शिल्पांमागील संकल्पना आहे.

शिल्पकार सोनाली अय्यंगार यांनी एका महिन्याच्या कालावधीत गणपती, हनुमान यांची शिल्प साकारली. ही शिल्पे तयार करण्यास दीर्घ प्रक्रिया करावी लागली.

माती, मेणाचे पॉलिशिंग, त्यानंतर अनेक पदार्थांचे अनेक थर व वेल्डिंग, पेंटिंग करून दोन्ही शिल्पे सुशोभित करण्यात आली.

मध्य रेल्वे प्रशासन भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात निवडक शिल्प जागतिक वारसा इमारतमध्ये लावण्यात आली आहेत. तसेच कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात जागतिक वारसा इमारतीमध्ये अशाच उपक्रमासाठी आणखी काही ठिकाणे निश्चित करण्यात येतील. या उपक्रमाद्वारे भारतीय कलाकारांना देशातील इतर ऐतिहासिक आणि प्रसिद्ध वास्तूंमध्ये त्यांचे कार्य मांडण्यास वाव मिळेल. – राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे