मुंबईत आजपासून (१ नोव्हेंबर) चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट सक्तीचा असणार आहे. आजपासून मुंबईत चारचाकी वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांचा हा नियम सर्वांसाठी चारचाकी वाहनधारकांसह प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे.

सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई ही ११ नोव्हेंबर पासून केली जाणार आहे. तोपर्यंत वाहतूक पोलिसांकडून केवळ समज दिली जाणार आहे. या दहा दिवासांच्या कालवधीत वाहतूक विभागाकडून जनजागृती केली जाणार आहे आणि प्रत्येक कारमध्ये मागील बाजूस सीटबेल्ट लावून घेण्यासाठी वेळ दिला गेला आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…

ज्या वाहनामध्ये प्रवासी बसतात त्या मागील बाजूस सीटबेल्टची व्यवस्था नव्हती त्यांना वाहतूक विभागाकडून सीटबेल्ट बसवून घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मूदत काल(३१ ऑक्टोबर) संपुष्टात आली आहे. त्यामुळे आजपासून सीटबेल्ट नसणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना वाहतूक पोलिसांकडून समज दिली जाणार आहे.

दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांमध्ये येत्या १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट सक्ती केल्यानंतर कारवाईला विरोध करतानाच हा केंद्रीय मोटर वाहन नियमच अमान्य असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबईच्या पोलीस सहआयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून नमूद केले आहे. सीटबेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या-पिवळ्या टॅक्सीशी तुलना करु नये. यामध्ये अनंत अडचणी तसेच काही मुद्देही असून याची अंमलबजावणी होणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. टॅक्सीतून चार प्रवासी प्रवास करतात. तेथे मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांसाठी दोन सीटबेल्ट दिलेले असतात. मागे बसलेल्या तीन प्रवाशांपैकी मधल्या आसनांवर बसलेल्या प्रवाशानेही सीटबेल्ट बांधणे बंधनकारक केले आहे.

केंद्रीय धोरणाने खासगी टॅक्सीशी तुलना करु नये, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबई सह पोलीस सहआयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण हे शून्य आहे. शहरात वाहनाचा सरासरी वेग हा १२ किलोमीटरपेक्षाही कमी आहे. हे मुद्दे विचारात घेता मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करु नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.