पलिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला स्वाइन फ्लूचा आणखी एक रुग्ण दगावला. याच महिन्यात शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण मुंबईबाहेरील होते.
कल्याण येथील चाळीस वर्षांचे अन्वर शेख गेल्या आठवडय़ापासून आजारी होते. कल्याण येथील रुग्णालयात उपचार घेऊनही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना महालक्ष्मी येथील पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे सव्वा तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. जानेवारी २०१३ पासून मुंबईत स्वाइन फ्लूचे ४६ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू झालेला नाही.

Story img Loader