मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला गेली सुमारे सहा-सात दशके विविध कलांच्या माध्यमातून व्यापून टाकणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या वेगळ्या धाटणीच्या लेखनाचा समावेश असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. १६) मुंबईत समारंभपूर्वक होणार आहे.

पुलंची भाषणे, पत्रव्यवहार, लेख असे जे साहित्य आजवर प्रकाशित झालेले नव्हते, त्याचे संकलन एका विशेषांकाद्वारे प्रसिद्ध करण्याच्या कल्पनेला मराठी वाचकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या या विशेष उपक्रमाचे वाचकांनी आवर्जून कौतुकही केले. या विशेषांकाची पहिली आवृत्ती संपल्यानंतरही वाचकांकडून आणखी प्रतींची मागणी येत राहिल्याने या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येत आहे. प्रकाशनाचा हा कार्यक्रम शनिवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता, माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे होणार आहे. याच वेळी ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे दिग्दर्शित ‘अपरिचित पुलं’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. पुलंचे अपरिचित पैलू उलगडणाऱ्या या कार्यक्रमात चंद्रकांत काळे यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर हेही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून प्रवेशिका तीस मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी मिळणार आहेत.

प्रायोजक.. व्हीटीपी रीअ‍ॅलिटी आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. आणि पितांबरी हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून पॉवर्ड बाय मँगो हॉलिडेज व पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स आहे.

’याच समारंभात विशेष कार्यक्रम : ‘अपरिचित पुलं’

’सहभाग – गिरीश कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि चंद्रकांत काळे

’कधी – शनिवार,

१६ फेब्रुवारी

’कुठे – यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा

’केव्हा – सायं. ६ वाजता

कार्यक्रम सर्वासाठी खुला

Story img Loader