मुंबई : राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत (टप्पा दोन) सुमारे १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल. या हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेतील ५८५ कर्मचारी अद्यापही निवडणूक कामात व्यस्त

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेंतर्गत उंबर्डा (जि. वाशिम) आणि नारंगवाडी (जि. धाराशिव) येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> राजकीय फलकबाजीला प्रतिबंध करा; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

कृषीपंपांना वीजपुरवठा करणारे सर्व फीडर टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनीवर येतील व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असे फडणवीस यांनी नमूद केले. या कार्यक्रमात उंबर्डा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उंबर्डा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट असून त्यातून १७११ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. नारंगवाडी येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा असून ८४५ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. वाशिम व धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी एक प्रकल्प आधीच सुरू झाला आहे. या योजनेअंतर्गत राज्यात नोव्हेंबरअखेर १५,७०८ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६६९ मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातून १,३०,४८६ शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Story img Loader