मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) उद्दिष्ट आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग देण्यात आला असून पुढील आठवड्यात चाचणी (ट्रायल रन) घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : पालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मेट्रो अ आणि ७ चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे. त्याचबरोबर मेट्रो २ अ मधील डहाणूकरवाडी ते डी एन नगर आणि मेट्रो ७ मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा १५ ऑगस्टला सुरू करण्याचे एमएमआरडीएने जाहीर केले होते. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने हा मुहूर्त चुकला. आता त्यासाठी डिसेंबरचा नवा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा – राणा दाम्पत्याच्या वक्तव्याने तपास, खटल्यावर परिणाम नाही; जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाची टिप्पणी

चाचणीची तयारी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात चाचणी होईल अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. चाचणी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरअखेरीस दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader