कालिना येथील जेनेक्स अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाचा खून केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंधेरी युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठातील नेपाळी सुरक्षा रक्षक किसनसिंग नागरजी याला अटक केली आहे. मृत सुरक्षारक्षक खडकसिंग हाही नेपाळचा होता.
खडकसिंग याच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगरे, ज्योत्स्ना रासम, आदींच्या  पथकाने त्याच्या सहकाऱ्यांसह मयत खडकसिंगचे नातवाईक, घटनास्थळजवळील व्यक्ती यांच्याकडे चौकशी केली. त्यात २८ फेब्रुवारीच्या रात्री मुंबई विद्यापीठातील रक्षक किसनसिंग नागरजी (४२) यांच्यात जेवणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली. किसनसिंग याची चौकशी केली असता दोघांमध्ये जेवणावरून भांडण झाले. तेव्हा आपण खडकसिंगचा गळा चिरून खून केल्याची कबुली त्यांने दिली.