मुंबईः मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला. लहान मुलगी मित्र – मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – मुंबईत १०४ ते १०७ टक्के पर्जन्यमान

हेही वाचा – मुंबई : शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू

याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी राहत्या इमारतीच्या खाली सोमवारी मित्र – मैत्रिणींसोबत खेळत होती. त्यावेळी तिला शौचालयात जायचे असल्यामुळे तिने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला महिलांच्या शौचालयाबाबत विचारणा केली. महिलांचे शौचालय बंद असून आरोपीने पीडित मुलीला पुरुषांच्या शौचालयात जाण्यास सांगितले. तेथून आल्यानंतर मुलीने पाण्याची मागणी केली असता आरोपीने मसाज रूममध्ये नेऊन पाणी देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार कुटुंबियांना याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली.

Story img Loader