ठाणे येथील वाघबीळ परिसरातील ‘त्या’ तीन वर्षीय बालिकेचा लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी गुरूवारी रात्री उशीरा  रामतीर्थ गौड (२८) यास अटक केली आहे. तो वाघबीळ परिसरातील एका इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतो.
वाघबीळ परिसरात राहणारी तीन वर्षीय बालिका घराबाहेर खेळत असताना अचानकपणे बेपत्ता झाली होती. दोन दिवसानंतर याच परिसरातील शेतालगत असलेल्या  डबक्यात तिचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. तसेच लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचे शवविच्छेदन प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले होते. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Story img Loader