मुंबईः मालवणी परिसरातील एका इमरतीच्या सुरक्षा रक्षकाने १० वर्षाचा मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाविरोधात विनयभंग व बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी इमारतीतील शिड्यांवरून खाली जात होती. त्यावेळी तिच्यासोबत कोणी नसल्याचे पाहून आरोपी सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याबाबतची माहिती मालवणी पोलिसांना दिली.
हेही वाचा… मुंबई : अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला
मालवणी पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली. याबाबत मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.