बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात भांडुप येथे एका खासगी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. अ‍ॅन्थनी फर्नाडिस (५५) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. बुधवारी रात्री भांडुप येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ ही घटना घडली,
 अ‍ॅन्थनी फर्नाडिस हे डायमंड सिक्युरिटी कंपनीत भांडुप कॉम्प्लेक्स येथे ते कामाला होते. काम संपल्यावर बुधवारी रात्री ते पालिकेच्या जलशुद्धिकरण प्रकल्पाजवळ झोपण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गुरुवारी सकाळी रक्ताचे डाग आढळल्याने त्यांचा शोध सुरू झाला. शोधाशोध केल्यावर जवळील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. बिबटय़ाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या अवयवाचे लचके तोडले होते. रात्री झोपेतच बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना फरफटत नेल्याचे पोलिसांनी सांगितले.    

Story img Loader