चेंबूर येथील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची मद्यपी तरुणाने हत्या केल्याचे उघड झाले आहे. शनिवारी सकाळी या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून आला होता. टिळकनगर पोलिसांनी चोवीस तासात त्या मद्यपी तरुणाला अटक केली आहे.
चेंबूरच्या एस के राय महाविद्यालयाजवळील इमारतीत अफजल खान (५५) हे सुरक्षा रक्षक काम करतात. दिवसा ते आईसक्रिम विक्रीचाही व्यवसाय करतात. शनिवारी सकाळी ते इमारतीजवळ मृतावस्थेत आढळले होते. अज्ञात इमसाने डोक्यावर वार करून त्यांनी हत्या केली होती. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी चोवीस तासात छडा लावून करण कालबागे (२२) या तरुणाला अटक केली. मद्य आणि अंमली पदार्थाच्या नशेत रात्रीच्या वेळी त्याने खान यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader