मुंबई : इमारतीसमोर खेळणाऱ्या दोन १० वर्षांच्या मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या २० वर्षीय सुरक्षा रक्षकाला गुरुवारी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित मुली नागपाडा येथील एका इमारती शेजारील मोकळ्या जागेत खेळत होत्या. आरोपीने १७ ते २० मार्च या कालावधीत १० वर्षांच्या दोन मुलींची छेड काढली. मुलींनी सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण बुधवारी छेडछाडीनंतर त्यांनी हा प्रकार आईला सांगितला. त्यानुसार मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात तक्रार केली.
हेही वाचा – दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली
हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग
हेही वाचा – गावी जाणाऱ्या मतदारांना कसे रोखणार? लोकसभा निवडणुकीआधी राजकीय पक्षांसाठी नवी डोकेदुखी
याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. मुलींचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला गुरुवारी नागपाडा येथून अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी आहे.