मुंबई : निवासी डॉक्टर, अध्यापक, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री आदींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे.

हेही वाचा – राज्यात २०१९ ते २०२१ या काळात एक लाख महिला बेपत्ता, त्यांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

हेही वाचा – मुंबई : कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील ‘परिशिष्ट अ’मध्ये नमूद १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील प्राध्यापक / सह प्राध्यापक, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार दोन सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकारी, दोन सुरक्षा निरीक्षक, १३ सुरक्षा पर्यवेक्षक आणि ८१३ सुरक्षा रक्षक अशी एकूण ८३१ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व सुरक्षा रक्षक महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित – पुणे, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ – मुंबई, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक भरण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून सर्व भत्त्यांसह ३० कोटी ५४ लाख ९७ हजार ९१३ रुपये वार्षिक खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.