मुंबई : राज्यात बंदी असतानाही परराज्यातून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून गुटखा आयात करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वन विभागाच्या धर्तीवर कारवाईचा बडगा उगारावा. कारवाईदरम्यान केवळ गुटखा जप्त करू नये, तर संबंधित वाहनही जप्त करावे, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले. यासंदर्भात कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यासाठी अधिसूचना काढावी, असी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

जंगलांमध्ये अवैधपणे वृक्षतोड करून लाकडांची विक्री करण्यात येते. वन विभाग कारवाई करताना अवैध लाकडांसह त्यांची वाहतूक करणारे वाहनही जप्त करते. राज्यातील गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी व परराज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी वन विभागाच्या धर्तीवर गुटखा वाहतूक करणारे वाहनही जप्त करावे. तसेच यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. याबाबतची अधिसूचना काढण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश संजय राठोड यांनी दिले. गुटखा विक्री, वाहतूकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी गुतल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी.

Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Police seized Gutkha worth rupees 21000 at Sawal Ghat
गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी, वाहनासह १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा >>> मुलुंडमध्ये मोटारगाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, पादचारी जखमी

गुटख्याप्रमाणेच बनावट औषधे, भेसळयुक्त अन्न, औषधे विक्री दुकाने आणि सौंदर्यप्रसाधने यांच्या नियमित तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान काही नियमबाह्य आढळल्यास संबंधितांना दोषी ठरवून कारवाई करण्यात येते. अन्न व औषध प्रशासनाने कारवायांमध्ये समानता आणावी, असे निर्देशही राठोड यांनी दिले. सौंदर्यप्रसाधने उत्पादकांच्या तपासण्यांचे प्रमाण कमी असून त्यात वाढ करावी. तसेच बनावट दूध व तेलाच्या प्रकरणांत सहआयुक्तस्तरावर तातडीने समिती स्थापन करावी. समितीचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.