लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : महानगरपालिकेतर्फे सातत्याने आवाहन व पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर १ एप्रिलपासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी – व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे. तसेच, पालिकेतर्फे आतापर्यंत पश्चिम उपनगरातील १ हजार ७६७, शहर विभागातील १ हजार २३२ तर पूर्व उपनगरातील ६०६ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्ताधारकांकडे एकूण १ हजार ६७२ कोटी ४१ लाख रुपयांची कर थकबाकी आहे. त्यापैकी २१८ कोटी ९६ लाख रूपये कर मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यात आला आहे.
विहित मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. दरम्यान, कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यादृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. निर्धारित कालावधीत कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या, तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत.
आणखी वाचा-निवडणुकांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअरप्ले ॲपशी संबंधीत ईडीची मोठी कारवाई
विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, १ एप्रिल ते २५ नोव्हेंबर पर्यंत महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागामधील कर थकविणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०३ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या ९० मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
२०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्याच्या पहिल्या सहामाहीची अंतिम देय मुदत १३ डिसेंबर २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी या अंतिम देय मुदतीपूर्वी कर भरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी मालमत्ता कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – बीकेसी मार्गिकेवर तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच
कर भरण्यासाठी सोमवारी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी
१) मेसर्स सेजल शक्ती रिॲल्टर्स (एफ उत्तर विभाग) – १४ कोटी ८५ लाख ९९ हजार २०८ रुपये
२) लक्ष्मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्तर विभाग) – १४ कोटी २९ लाख ९० हजार १२१ रुपये
३) मेसर्स एशियन हॉटेल्स् लिमिटेड (के पूर्व विभाग) – १४ कोटी १८ लाख ९२ हजार ३०२ रुपये
४) सहारा हॉटेल्स् (के पूर्व विभाग) – १३ कोटी ९३ लाख ५० हजार ९६३ रुपये
५) मेसर्स न्यूमॅक ॲण्ड रिओडर जे. व्ही. (एफ उत्तर विभाग) – १३ कोटी ४५ लाख ४४ हजार ८१२ रुपये
६) मेसर्स फोरमोस्ट रिॲल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग) – १२ कोटी ५० लाख ९० हजार १३९ रुपये
७) श्री साई पवन को – ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग) – ११ कोटी ६९ लाख ४५ हजार ५८ रुपये
८) कमला मिल्स लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – ११ कोटी ४७ लाख २५ हजार १३० रुपये
९) श्री एल. एन. गडोदिया ॲण्ड सन्स लिमिटेड (एच पश्चिम विभाग) – ११ कोटी ४४ लाख ९७ हजार ५८२ रुपये
१०) मोहीत कन्स्ट्रक्शन कंपनी (के पश्चिम विभाग) – ११ कोटी २६ लाख ५६ हजार २६७ रुपये