मुंबई : कझाकिस्थान येथे होणाऱ्या १२ व्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी चेंबूरमधील झोपडपट्टीतील १४ खेळाडूंची निवड झाली आहे. मात्र या खेळाडूंच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असून कझाकिस्थानमध्ये जाण्यासाठी येणाऱ्या मोठ्या खर्चासाठी या खेळाडूंनी दानशूरांना साद घातली आहे.
हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!
हेही वाचा <<< मुंबई : विस्टाडोम डब्यासह धावणार तेजस एक्स्प्रेस ; कोकण मार्गावर दुसरा विस्टाडोम डबा
चेंबूरमधील जवाहर नगर परिसरातील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्र आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांना १९९७ पासून जिम्नॅस्टिक्सचे धडे देण्यात येत आहेत. येथे जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकावली असून १२ जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.
कझाकिस्थानमध्ये येत्या २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान १२ वी आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी निवड झाली १४ खेळाडू सध्या सराव करीत आहेत. तेथे जाण्यासाठी एका खेळाडूला एक लाख ६४ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे खेळाडूंनी दानशूरांना साद घातली आहे. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या खेळाडूंना मदत करावी, असे आवाहन मुख्य प्रशिक्षक राहुल ससाणे यांनी केले आहे.