मुंबई : राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या खास तासिकेप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका असावी, यासाठी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यांसारख्या स्वसंरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी २ तासिका घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून, विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : तोतया अधिकाऱ्याकडून तरुणाची फसवणूक

हेही वाचा – Audi Ola Accident : ऑडीला ओलाची धडक; संतप्त कारचालकाने थेट उचलून आपटलं, VIDEO व्हायरल

राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने ‘हर घर दुर्गा अभियान’ सुरू करीत आहोत, असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self defense class will be held in iti in maharashtra har ghar durga abhiyan for women in the state mumbai print news ssb