अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ येथील शिवसेना शहर शाखेत प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी शनिवारी ब्रिजेश सिंग याला उल्हासनगरमधून आणि प्रदीप जाविरकर याला अंबरनाथ येथून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सिंग आणि जाविरकर या दोघांना १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Story img Loader