ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांचे आज(शनिवार) पहाटे फुफ्फुसाच्या आजाराने बॉम्बे रूग्णालयात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सुहास भालेकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सारांश, फुटपायरीचा सम्राट या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ नाटक,मालिका आणि चित्रपटांमध्ये ते अभिनय करत होते. सुहास भालेकर यांनी पन्नासहून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला होता. त्यांच्या जाण्याने एक हरहुन्नरी कलांवत मराठी रंगभूमीने गमावल्याची भावना सिनेकलांवतांमध्ये व्यक्त होत आहे .