खगोल मंडळ आणि रामनारायण रुईया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १४ एप्रिल रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व गणितज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. डॉ. नारळीकर यांनी लिहिलेल्या आणि मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘चार नगरातील माझे विश्व’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे. दिलीप जोशी आणि डॉ. अभय देशपांडे हे डॉ. नारळीकर यांच्याशी संवाद साधणार असून मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉ. नारळीकर यांची पुस्तके येथे सवलतीत उपलब्ध असतील. हा कार्यक्रम दुपारी चार वाजता रुईया महाविद्यालय सभागृह, तिसरा मजला, माटुंगा (पूर्व) होणार असून तो सर्वासाठी खुला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी खगोलशास्त्राशी संबंधित प्रश्न डॉ. नारळीकर यांना विचारण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.
डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘चार नगरातील माझे विश्व’
खगोल मंडळ आणि रामनारायण रुईया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १४ एप्रिल रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व गणितज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
आणखी वाचा
First published on: 13-04-2013 at 03:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior mathematicians jayant narlikar appearing for interview programme