उत्तराखंडमध्ये अस्मानी आपत्तीत अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांची सुटका करून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय सेवेतील अधिकारी, महसूल व परिवहन विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स व इतर कर्मचारी असे ५० जणांचे पथक उत्तराखंडमध्ये पाठवले आहे.  
या कामात समन्वय ठेवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव आणि राष्ट्रीय ग्रामीण मिशनचे संचालक विकास खारगे यांची डेहराडून येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत २१३० व्यक्तिंशी संपर्क साधण्यात यश मिळवले आहे. अडचणीतून बाहेर पडलेल्या प्रवाशांना महाराष्ट्रात सुखरूप पाठवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. याखेरीज, ०२२-२२०२७९९०/२२८१६६२५ या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.
उत्तराखंडमधील अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक
एम. एस. रामचंदानी  ९९८७११४९९३
मनोज रानडे – ९९२०७८२५७१
जयकृष्ण फड – ८९७५१७८१२२
नितीन मुंडेवार – ९४२३९६२२४३
अमित शेडगे – ९७६६०४०९३१
दिल्लीत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांची नावे व संपर्क
आर. एम. मदने – ९४२२०८८८८९
विजय शलके – ९७०२३७८३८३
दीपक उगले – ९७६६६७७४४७

Story img Loader