मुंबई : ‘कदाचित अजूनही’ यासारख्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रहासह साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती मराठी भाषा विकासमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी भाषा विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी विंदा करंदीकर पुरस्कार देण्यात येतो. यंदा त्यासाठी अनुराधा पाटील यांची निवड करण्यात आली. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रकाशन संस्थेला देण्यात येणारा श्री. पु. भागवत पुरस्कार पुण्यातील पद्मगंधा प्रकाशनाला देण्यात येणार आहे. डॉ अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार तंजावर येथील प्रा. आर. विवेकानंद गोपाळ यांना, तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनिल गोरे ऊर्फ मराठीकाका यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रम कुठे?:  कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून या सर्व पुरस्कारांचे वितरण होईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. मराठी भाषेचा प्रवास या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम त्या वेळी सादर केला जाईल, असेही सुभाष देसाई यांनी जाहीर केले. मराठी भाषा विकास विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे या वेळी उपस्थित होत्या.